Navigation |
प्रेम अपने कार्य का आधार है21 जून 1940 रोजी प. पू. डॉ. हेडगेवारांचे निधन झाल्यावर त्यांच्याच इच्छेनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दायित्व (जबाबदारी) श्रीगुरुजींवर आली. 3 जुलै 1940 रोजी नागपूरातील रेशीम बागेवर तीन-साडेतीन हजार गणवेशधारी स्वयंसेवक उपस्थित होते. नागपूर प्रांताचे संघचालक बाबासाहेब पाध्ये यांनी श्रीगुरुजींच्या सरसंघचालकत्वाची घोषणा केली व नव्या सरसंघचालकांना पहिला प्रणाम समर्पित केला. नूतन सरसंघचालक या नात्याने केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात श्रीगुरुजी म्हणाले, ''आईनं आपल्या मुलावर प्रेम करावं, तसं प्रेम डॉक्टरांनी आमच्यावर केलं. केवळ निरपेक्ष वृत्तीची व्यक्तीच अशा प्रकारे प्रेम करू शकते. पुण्याच्या संघशिक्षावर्गात अखेरचे भाषण करताना स्वयंसेवकांचे परस्परांवर बंधुवत प्रेम असावे, असा उल्लेख डॉक्टरांनी केला होता. ते प्रेम कसे करावे याचे उदाहरण स्वत: डॉक्टरच होते. अशा प्रेमाच्या बळावर माणसांची मने जिंकली जातात. आठवण होते विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांबद्दल काढलेल्या उद्गारांची. तीक्ष्ण बुध्दीचा नरेंद्र हर ठिकाणी श्रीरामकृष्णांच्या उद्गारांवर शंका घेणारा व सतत प्रश्न उत्पन्न करणारा होता. कसे जिंकले या नरेंद्राला त्यांनी? केवळ प्रेमाच्या बळावर! वादात निरुत्तर करून जिंकले, असे झाले नाही. त्यामुळे विवेकानंदांनी पुढे अतिशय भावपूर्ण शब्दांत आपल्या गुरूंविषयी म्हटले, ''खरं प्रेम करावं तर श्रीरामकृष्णांनीच. त्यांच्याइतकं प्रेम माझ्यावर कुणीही केलं नाही. केवळ त्या प्रेमाच्या बळावर त्यांनी मला जिंकलं.'' श्रीगुरुजी पुढे म्हणाले, ''मातेचं वात्सल्य, पित्याची जबाबदारीची जाणीव आणि समर्थ अशा गुरूचं ज्ञान, या सा¬यांचं एकत्रित दर्शन डॉक्टरांच्या ठायी होत होतं. परस्परांशी कोणतंही नातं न मानणा¬या, या सर्वस्वी विस्कळीत अशा हिंदू समाजात, पत्थरातून मूर्ती घडवावी तशा प्रकारे, डॉक्टरांनी पंधरा वर्षांत एक लाख स्वयंसेवक संघाच्या छत्राखाली आणले. हेच त्यांच्या महापुरुषत्वाचे पुरेसं प्रमाण आहे. एक एक स्वयंसेवक जवळ करीत आणि त्याची चिंता वाहात डॉक्टरांनी ही संघाची संघटना उभी केली...'' अशा प्रेमाचा वारसाच श्रीगुरुजींनीही पुढे आयुष्यभर चालविला. शुध्द सात्त्वि प्रेम अपने कार्य का आधार है ॥ |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |