Navigation |
जीवनपुष्पे देशासाठी सहज अर्पिण्या1947 च्या फाळणीच्या वेळी लाहोरमध्ये हिंदूंचा भीषण संहार चालू होता. सैन्याबरोबरही मुस्लिम गुंड लढत होते. एका ठिकाणी मुस्लिम गुंडांनी घराच्या छपरावर मोर्चा बसविला होता. छपरावरूनच ते गोळीबार करून येणा¬या जाणा¬या हिंदूंना गोळयांनी टिपत होते. भारतीय सैन्याच्या एका तुकडीला त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पाठविण्यात आले. सैन्याला त्यांच्यावर गोळया चालविणे अशक्य होऊन गेले, कारण ते छपरावरील भिंतीआडून गोळीबार करत होते. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या हातातील बंदूक हिसकावून घेणे आवश्यक होते. लष्कराचा कोणीही सैनिक आपला जीव धोक्यात घालवायला तयार नव्हता. सेनाधिकारी अत्यंत विवंचनेत पडले होते. तेवढयात गर्दीतून एक तरुण पुढे सरसावला. घराच्या लोहनलिकेला पकडून तो सरसर वर चढू लागला. गुंड त्याच्यावरही गोळया चालवू लागले. कसाबसा तो वर चढला. जखमांनी तो घायाळ झाला होता. पण त्याची यत्ंकिचितही पर्वा न करता गुंडांकडून बंदूक हिसकावून घेण्यात तो यशस्वी झाला. गुंड पळून गेले. तेव्हाच सैन्य त्या घराचा कब्जा करू शकले. थोडयाच वेळात त्या युवकाचे प्राण गेले. एका अर्थी गड आला पण सिंह गेला. थोडया वेळाने लक्षात आले की, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता. सेनाधिका¬यांवर या घटनेचा फारच प्रभाव पडला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताची दु:खद फाळणी झाली. भारतीय (हिंदू) सैन्याला भारतात बोलाविण्यात आले. दोनच महिन्यांनंतर श्रीगुरुजींचा पंजाबात प्रवास झाला. ते अमृतसरलासुध्दा गेले. वर सांगितलेल्या प्रसंगी उपस्थित असलेला सेनाधिकारी तेथील शाखेत आपल्या तुकडीसह, सैनिकी गणवेशात उपस्थित झाला. श्रीगुरुजींनी जसा ध्वज फडकाविला, तसे सैनिकांनी बंदुका उडवून ध्वजाला सैनिकी पध्दतीची मानवंदना दिली. लोक आश्चर्यचकित झाले की, हे कसे काय घडले? संघाचा उत्सव झाल्यावर त्या सेनाधिका¬याने नतमस्तक होऊन श्रीगुरुजींना प्रणाम केला. परिचय झाल्यावर त्या अधिका¬याने वरील सर्व घटना सांगितली आणि तो म्हणाला, ''संघाच्या त्या स्वयंसेवकाचा तो पराक्रम पाहून मी अत्यंत चकित झालो आहे. मरायला आणि मारायला नेहमीच सिध्द असलेले व पगार घेऊन काम करणारे सैनिकही जेथे पुढे सरकायला धजत नव्हते, तेथे त्या स्वयंसेवकाने स्वयंस्फूर्तीने पुढे सरसावून लोकांचे प्राण वाचविले आहेत. हीच तत्परता मला अन्य स्वयंसेवकांमध्येही बघायला मिळाली. भारतीय सेनेचे शूर सैनिकही जे धैर्य, जो पराक्रम दाखवू शकले नाहीत, ते साहस तुम्ही तुमच्या स्वयंसेवकांमध्ये कसे निर्माण करता?'' श्रीगुरुजींनी उत्तर दिले, ''शाखेत नित्य कबड्डी खेळवून!'' हे उत्तर त्या सेनाधिका¬याला काही पटले नाही. त्याने श्रीगुरुजींना विचारले, ''कबड्डीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वयंसेवकांमध्ये इतका पराक्रम कसा काय भिनवू शकता?'' आपल्या गोष्टीचा अधिक खुलासा करताना श्रीगुरुजी म्हणाले, ''संघाच्या शाखेत रोज एकत्रित होऊन स्वयंसेवक खेळतात. त्याचप्रमाणे अन्य शारीरिक आणि बौध्दिक कार्यक्रमात भाग घेतात. स्वयंसेवक कोणत्याही जातीचा अथवा पंथाचा असला किंवा सुशिक्षित अथवा अशिक्षित असला, किंवा कोणतीही भाषा बोलणारा असला तरी, तो सर्व भेदभाव विसरतो. अशा प्रकारे 'आपण सर्व या भारत मातेची लेकरे आहोत' या भावनेने सर्व स्वयंसेवकांमध्ये बंधुत्वाची व आपलेपणाची भावना आणि मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करण्याचा भाव जागविला जातो. शाखांमध्ये नित्य अशाच प्रकारचे संस्कार केले जातात. जे लोक संघाच्या दैनंदिन शाखांवर येत नाहीत त्यांना हे समजणे कठीणच आहे की, कबड्डीसारख्या खेळाच्या माध्यमातून अशा प्रकारे देशप्रेम, धर्मप्रेम शिकविले जाते. स्वयंसेवकांच्या देश व धर्मासाठी तत्परतेने प्राण अर्पण केले. हे आत्मबलिदानच माझ्या म्हणण्याचा पुरावा आहे.' संस्कारांचे सुंदर मंदिर संघस्थान हे आमुचे |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |