Navigation |
आक्रमणा नच साहिल भारत...15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले पण भारतमाता खंडित झाली. काश्मीर संस्थानचे महाराजा हरिसिंग हे काही केल्या काश्मीर भारतात विलीन करण्यास तयार होईनात. याच दरम्यान पाकिस्तानने मुस्लिम टोळीवाल्यांच्या माध्यमातून काश्मीरवर आक्रमण केले. शेख अब्दुल्लांचा कैवार घेऊन पं. नेहरू काश्मीरमध्ये सैन्य पाठविण्यास तयार होत नव्हते. महाराजा हरिसिंग स्वत: तर दुर्बळ होतेच, त्यातच त्यांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिक त्या टोळीवाल्यांना जाऊन मिळाले. 20 ऑक्टोबर 1947 रोजीच श्रीनगरात पाकिस्तानी ध्वज फडकावून आनंदोत्सव साजरा करण्याची आक्रमकांची योजना होती. त्यावेळी विलीनीकरण विभाग केंद्रीय गृहमंत्री सरदार पटेलांकडे होता. अशा पेचात असताना पटेलांनी श्रीगुरुजींना दिल्लीला पाचारण केले. 'नेहरूंच्या अटी मान्य करवून काश्मीर भारतात विलीन करण्यास महाराजा हरिसिंगांचे मन अनुकूल करणे' ही श्रीगुरुजींवर जबाबदारी होती. काश्मीरचे तत्कालीन पंतप्रधान मेहेरचंद महाजन यांच्याकडून श्रीगुरुजींना भेटीचे निमंत्रण येईल अशी व्यवस्था सरदार पटेलांनी केली. काश्मीर भारतातच राहावा अशीच श्रीगुरुजींचीही इच्छा होती. हरिसिंग व श्रीगुरुजींची भेट 17 ऑक्टोबर 1947 रोजी झाली. प. पू. श्रीगुरुजींनी समजावून सांगितले, ''आपण हिंदू राजे आहात. पाकिस्तानात विलीनीकरण केल्यास आपले व आपल्या प्रजेचे जीवित धोक्यात येईल. आज भारतातून ये जा करण्याचे रस्ते, रेल्वे व विमान वाहतुकीची व्यवस्था नाही हे खरे आहे. परंतु ती सोय फारच लवकर करता येईल. भारतात विलीन होण्यातच आपले व आपल्या संस्थानाचे कल्याण आहे.'' श्रीगुरुजींनी आपली शिष्टाई यशस्वी केली. महाराज हरिसिंग विलीनीकरणास तयार झाले. 26 ऑक्टोबरला तशा सह्याही झाल्या. चर्चेदरम्यान हरिसिंग म्हणाले, ''संघाच्या स्वयंसेवकांनी आम्हाला वेळोवेळी अत्यंत महत्त्वाच्या वार्ता पुरविल्या आहेत. अशा वार्ता मिळविताना संघाच्या स्वयंसेवकांनी जे साहस दाखविले, त्याची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे.'' आक्रमकांशी झुंजत झुंजत समरी विजयी होऊ चला । |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |