Navigation |
वंग पंचनद बलिवेदीवर झाले जे बलिदान5 ते 8 ऑगस्ट 1947 या दरम्यान श्रीगुरुजींचा सिंध प्रांतात प्रवास झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. विस्थापित मात्र भयानक संकटात होते. त्यांना धीर देण्यासाठी श्रीगुरुजींनी सप्टेंबर 1947 मध्ये पंजाबचा प्रवास केला. श्रीगुरुजींनी त्या वेळी अक्षरश: जीव धोक्यात घालूनच तो प्रवास केला. वाटेत एक नदी ओलांडताना चेहडू नावाचा एक पूल लागला. तो आधीच कोसळला होता. रेल्वेचे रूळ लोंबत होते. खाली नदीला पूर आला होता. कार्यकर्त्यांनी धोका लक्षात आणून दिला. पण क्षणाचाही विलंब न लावता श्रीगुरुजींनी सरसर चालत जाऊन तो पूल ओलांडलासुध्दा! याच दरम्यान काँग्रेसचे सर्व नेते पश्चिम पंजाबातून पळून गेले होते. मुसलमानांनी केलेल्या हिंदूंच्या कत्तलींना आणि हिंदू महिलांवरील बलात्कारांना ऊत आला होता. महात्मा गांधी, दि काँग्रेस ऍंड दि पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकात देवचंद झा यांनी लिहिले आहे की, ''फाळणीच्या या घटनेपायी 6 लाख आबालवृध्द स्त्रीपुरुष मृत्युमुखी पडले, दीड कोटी माणसे निर्वासित झाली. तेथील हिंदूंना, ''मुसलमान व्हा आणि तुमच्या तरुण मुलींची लग्नं मुस्लिम तरुणांशी लावून द्या'', असे सांगण्यात आले. अशा दुर्घर प्रसंगी संघ स्वयंसेवकच हिंदूंच्या मदतीला धावून आले. पंजाब नॅशनल बँकेचे एक ज्येष्ठ पदाधिकारी ए. एन. बाली यांनी 'नाऊ इट कॅन बी टोल्ड', हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी अत्यंत कृतज्ञतापूर्वक म्हटले आहे की, संघ हाच एकमेव हिंदूंचा तारणहार होता. तर, गुरुजी हे त्याचे नेते होते. या कर्तव्यपालनासाठी हजारो स्वयंसेवकांनी हौतात्म्य पत्करले. एकदा प्रसिध्द मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे, डॉ. वि. रा. करंदीकर आणि लेफ्टनंट जनरल थोरात व सौ. थोरात गप्पा मारत होते. पु. लं. नी संघावर टीका केली. त्यावेळी सौ. थोरात उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, ''ते तुमचे काय असेल ते असो. फाळणीच्या वेळी निर्वासितांसाठी आणि स्त्रियांच्या अब्रूच्या रक्षणासाठी पंजाबच्या भागात, संघाच्या स्वयंसेवकांनी अतिशय निर्भयपणे जे काम केले, ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही.'' पुढे एका प्रसंगी श्रीगुरुजी म्हणाले, ''आता यापुढे, मी महाभारतातील अभिमन्यूचा संदर्भ कधीही देणार नाही. माझे हजारो अभिमन्यू, जे सिंध-पंजाबात लढत राहिले, ते कधी परत आलेच नाहीत.'' वंग पंचनद बलिवेदीवर झाले जे बलिदान |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |