Navigation |
मी अंत:करणाची निर्मलता बघितलीश्रीगुरुजींच्या मद्रासच्या प्रवासात काही खेडेगावांत कार्यक्रम ठेवले होते. श्री. यादवराव जोशी बरोबर होते. गावक¬यांच्या उत्साहाला आणि आनंदाला सीमाच नव्हती. एकदा गावच्या पटवा¬याकडे (पाटलाकडे) आजूबाजूच्या गावातील प्रमुख सज्जन मंडळी जमली होती. गप्पागोष्टी झाल्यावर पुढील गावी जायचे होते. परंतु पटवा¬याने आग्रह केला, ''गुरुजी, माझ्या घरचे थोडेसे आतिथ्य, किमान चहा तरी घ्यावा.'' पटवारी घरवालीला चहा करण्यासंबंधी सांगून आले. जेथे श्रीगुरुजी व इतर मंडळी बसली होती तेथून आत चालू असलेली धावपळ दिसत होती. घर अगदी छोटेच होते. पटवा¬याच्या बायकोने अद्यापपर्यंत चहाच बनवला नव्हता. तिने दूध, गूळ आणि चहाची भुकटी एकत्र उकळविली तरी खरी! पुढे काय करावे या विचारातच बराचसा वेळ गेला. चहा का येत नाहीये, म्हणून बघायला हे पटवारी आत गेले, तेव्हा त्यांना समजले की गाळणेच नाहीये. त्यांनी आपल्या धोतरानेच चहा गाळला. इथपर्यंत चहा थंडगार झाला होता. काही का असेना, चहा तर झाला! मोठमोठया प्याल्यांमध्ये सर्वांना चहा दिला गेला. श्रीगुरुजींनी संतोषाने तो चहा प्याला. बाकीच्या लोकांनी काही ना काही सबबी सांगून चहा पिण्याचे टाळले. गावक¬यांनी भक्तीने व श्रध्देने निरोप दिला. गाडी चालू झाल्यावर बाकीच्या कार्यकर्त्यांनी विचारले, ''गुरुजी, ज्याच्यात चहा गाळला, ते धोतर आपण नाही बघितलेत? कुणास ठाऊक किती वर्षांची घाण त्यात साठली असेल!'' श्रीगुरुजी उत्तरले, ''तुम्ही त्या धोतरातील घाण कशाला बघता? त्या लोकांच्या अंत:करणाची निर्मलता आणि उत्कट भक्ती का नाही बघत?'' या प्रसंगावर भाष्य करताना यादवराव जोशी म्हणाले, रा. स्व. संघावरील बंदी उठली होती. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाच्या कार्यकर्त्यांची बैठक हरिगढ (अलीगढ) येथे योजली होती. एक निर्धन वृध्द नागरिक मोठया श्रध्देने त्याच्या शेतातील शेवग्याच्या शेंगा श्रीगुरुजींना भेट द्यायला आला. श्रीगुरुजींनी अत्यंत आत्मीयतेने त्या शेंगा स्वीकारल्या. सर्वजण शेंगा विसरून गेले. मध्याह्नी भोजनापूर्वी श्रीगुरुजींनी एका स्वयंसेवकाला सांगितले, ''बघ, विसरू नकोस. त्या शेंगांची आमटी माझ्यासाठी अवश्य बनवायला सांग. अत्यंत प्रेमाने तो शेंगा भेट देऊन गेला आहे.'' गिरिराज किशोर या प्रसंगावर भाष्य करताना म्हणतात - |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |