आपले उद्दिष्ट : एक राष्ट्र
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
राष्ट्राची चिरंतन शक्ती निर्माण करण्याचे आपले ध्येय लोकांना समजावून सांगताना एकदम ते त्यांच्या लक्षात जरी आले नाही तरी काम करीत असताना आपला जसजसा एकेका माणसाशी संबंध येत जाईल तसतसे हे ध्येय त्यांना आपल्यला समजावून सांगता आले पाहिजे. हा देश आपला आहे, हा समाज आपला आहे, हे राष्ट्र आपले आहे आणि या राष्ट्राचे श्रेष्ठ जीवन निमाृण करण्यासाठीच निरनिराळया क्षेत्रांत हे सर्व व्यवहार होत आहेत, हेच ही जी निरनिराळीकामे आहेत त्यांचे उद्दिष्ट आहे. आपल्यापुढे हे राष्ट्र नसेल तर बाकीच्या व्यवहारांशी आपल्याला कर्तव्यच कोणते?