नवा जोडा आणि जुने जोडे
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
माझ्या वडीलमुलीच्या विवाहप्रसंगी आमच्या परिवारातले ज्येष्ठ म्हणून श्रीगुरूजी विवाहनिमित्त होणाऱ्या सर्व लहानसहान कार्यक्रमांना उपस्थित राहात होते. सीमंत पूजनाचा कार्यक्रम संपवून मंडळी बाहेर आली तो अनेकांचे जोडे चोरीस गेल्याचे दिसून आले. श्रीगुरूजींच्या चपलासुध्दा त्यातून शिल्लक राहिल्या नाहीत. प्रत्येकजण जोडे शोधण्यात मग्न झाला. तोच श्रीगुरूजी बाहेर येऊन म्हणतात, ''नवा जोडा'' पाहण्यात तुम्ही सगळे व्यग्र झालात म्हणून बिचाऱ्या जुन्या जोडयांनी पळ काढला !'' जोडी चोरीस गेल्यामुळे खिन्न झालेली मंडळी श्रीगुरूजींच्या या कोटीवर हसत हसत चोरी गेलल्या जोडयांचा शोध करणे सोडून निघून गेली.