डॉक्टरांचा वरदहस्त
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
डॉक्टरांच्या या आश्वासनाने मला धीर आला. दुसऱ्याच दिवशी मी माझ्या ओळखीची घराजवळची समवयस्क शिशुमंडळी गोळा करून मोहिते वाडयात गेलो. डॉक्टरांनी मला आमचा शिक्षक निवडण्यास सांगितले. त्या किशोर मंडळींत माझ्या ओळखीचा एक होता. त्याला मी निवडले. त्या दिवशी शिशूंचा वर्ग संघात प्रथम सुरू झाला.
त्यानंतरचे माझ्या आयुष्यातले डॉक्टरांच्या संपर्कात आलेले अगदी सामान्य प्रसंग सांगून लहानसहान पोरासोरांची संपूर्ण माहिती ते कसे ठेवीत, एवढेच नव्हे तर एखाद्या विवक्षित ठिकाणी ज्या बाल स्वयंसेवकाची उपस्थिती अपेक्षित असली आणि तेथे तो न दिसला तर तो भेटल्याबरोबर अमुक ठिकाणी तू का दिसला नाहीस ? मला वाटले तेथे तू भेटशील, या अर्थाचे वाक्य ते उच्चारीत.