गंगा लहरी
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
गंगा आपल्यासाठी पवित्र आहे. आपल्यापैकी कोणास गंगेच्या पवित्रतेचा अनुभव आला आहे की नाही हे मला ठाऊक नाही पण मी मात्र असा अनुभव घेतला आहे. मी कित्येक रात्री गंगाकिनारी बसून व्यतीत केलेल्या आहेत.
गंगेच्या पाण्यात छोटे छोटे तरंग उठत असतात. त्यांचा खेळ मोठा सुंदर दिसतो. तो पाहता पाहता अंत:करण पवित्रतेने भरून जाते आणि समस्त कुविचार वाहून जातात.
 
मी आपल्या स्वत:च्या अनुभवाने हे सांगतो.