गरम पाणी
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
अशीच एक घटना. नैनीतालमध्ये थंडीचे दिवस होते. मी दक्षिणेत राहणारा असल्यामुळे मला गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय आहे. मी कार्यकर्त्यांना सांगितले की, गरम पाण्याची व्यवस्था करा. थोडया वेळाने एका कार्यकर्त्याने सांगितले की, अंघोळीसाठी गरम पाणी ठेवले आहे. मी कपडे घेऊन स्नानगृहात गेलो. गरम पाणी पाहू लागलो. एका टबमध्ये काल रात्री भरलेले थंड पाणी होते. जवळच एक बादली ठेवलेली होती. थोडया बारकाईने पाहिल्यावर लक्षात आले की, बादलीच्या तळाशी थोडे कोमट पाणी होते. मी टबमधल्या गार पाण्याने आनंदाने स्नान केले. पत्ताही लागला नाही की, त्या पाण्याचे तापमान किती होते? ते पाणी बर्फासारखे गार होते.
 
कार्यकर्त्याला असे नरम गरम अनुभव नेहमीच येत असतात. त्यातच त्याला आनंद असतो.