Navigation |
'जनता जनार्दन''जनता ही जनार्दनाचेच स्वरूप आहे, ही श्रेष्ठतम दृष्टी हा आपल्या राष्ट्रकल्पनेचा गाभा आहे. आपल्या विचारमालिकेत सर्वत्र हीच दृष्टी भरलेली आहे. आपल्या श्रेष्ठ सांस्कृतिक ठेव्यामध्ये आढळणाऱ्या अनुपम कल्पनांचा उदयही यातूनच झालेला आहे. यातूनच पुढे अशी दृष्टी व प्रेरणा उदित होते की, समाजातील प्रत्येक व्यक्ती ही त्या पूर्ण दिव्यत्वाचाच अंश आहे. समाजातील सर्व व्यक्ती सारख्याच पवित्र आहेत, सेवा करण्यास योग्य आहेत. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणे हे निंद्य आहे. अशा प्रकारे समाजसेवेच्या भावनेला ईश्वरसेवेचे परमउदात्त रूप आपल्या राष्ट्रीय संस्कृतीने दिले आहे. श्री. रामकृष्ण परमहंसांनी समाजातील सेव्य अशा दलितपीडित लोकांना दरिद्रनारायण म्हटलेले आहे.' |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |