काळाची गरज

आज गरज ही आहे की हिंदू राष्ट्राची ही संकल्पना हृदयात धारण करून व निर्भयपणे राष्ट्रीय जीवनसत्य उद्धोषून आपल्या तेजस्वी स्वरूपात राष्ट्राने उभे राहिले पाहिजे. हिंदू राष्ट्राची संकल्पना क्षीण झाली तर कशी वाताहत होते, शत्रुमित्र संबंधांचा विवेक कसा हरपतो, हे इतिहासाने सिध्द केलेले आहे. हे सत्य हृदयात जागे झाले तेव्हा राष्ट्रीय तेज झळाळून उठल्याचेही प्रसंग आहेत. तेव्हा राष्ट्र संकल्पना हे सर्व हिंदुत्ववादी कार्याचे प्राणतत्त्व असले पाहिजे. श्रीगुरूजींच्या शब्दांतच लेखाचा समारोप करतो -
''राष्ट्राच्या संघटनेचे सूत्र आपापल्या भिन्न भिन्न कार्यक्षेत्रात प्रत्यक्षपणे निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. ही जी निरनिराळी कामे दिसतात, त्या सर्वांचे उद्दिष्ट एकच आहे हा देश आपला आहे. हा समाज आपला आहे. हे राष्ट्र आपले आहे आणि या राष्ट्राचे श्रेष्ठ जीवन निर्माण करण्यासाठीच निरनिराळया क्षेत्रांत हे काम होत आहे. राष्ट्र हेच आपले उपास्य दैवत आहे आणि त्याच्या सेवेसाठीच ही सारी कामे आहेत. आपल्या दृष्टीपुढे जर हे राष्ट्र नसेल, तर बाकी व्यवहाराशी आपले काय देणे-घेणे असणार ?''