नावेची गोष्ट
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
मद्रास मत्स्यालयात माझे अध्ययन चालू होते. त्या काळात आम्ही काही विद्यार्थी समुद्रात मासे पकडण्यासाठी जात असू. एकदा असेच एका नावेत आम्ही बसलो होतो. मी आपले दोन्ही पाय पाण्यात टाकून बसलो होतो.
 
आमच्या नावेजवळच आणखी एक नाव होती. एकाएकी त्या नावेचा नाविक तामीळ भाषेत जोरात ओरडला.
 
मला त्याचे ओरडणे समजले नाही. परंतु माझ्याबरोबर जे होते त्यांनी मला लगेच पाय वर करायला सांगितले. मी पाय वर घेतले. खाली पाण्यात पाहिले, तर एक प्रचंड शार्क मासा नावेजवळ पोहोचलेला होता. जर मी पाय वर केले नसते आणि शार्क माशाने मला त्या दिवशी पकडले असते तर?