श्रीगुरुजींचा जीवनपट
श्रीगुरुजी (मराठी) 24-Oct-2017
1906
: दि. 19 फेब्रुवारी : नागपुरात जन्म (सोमवार, माघ कृ. 11, शके 1827).
1928
: एम्. एस्सी. उत्तीर्ण; प्राणिशास्त्र विषयात प्रथम क्रमांक.
1930-33
: बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापक. तेथेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध.
1934
: नागपुरातील तुळशीबाग संघशाखेच्या कार्यवाह पदावर नियुक्ती.
1935
: एल्एल्.बी. उत्तीर्ण.
1939
: दि. 13 ऑगस्ट : सरकार्यवाह पदावर नियुक्ती.
1940
: दि. 21 जून : संघ-संस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे महाप्रयाण.
दि. 3 जुलै
: गुरुजी सरसंघचालक झाल्याची प्रकट घोषणा.
1948
: दि. 30 जानेवारी : महात्माजींचे दु:खद निधन.
दि. 1 फेब्रुवारी
: गुरुजींना नागपुरात अटक.
दि. 4 फेब्रुवारी
: संघावर बंदी.
दि. 6 ऑगस्ट
: गुरुजींची सुटका.
दि. 12 नोव्हेंबर
: गुरुजींना दुस¬यांदा अटक.
1949
: दि. 12 जुलै : संघ-बंदी बिनशर्त उठली.
दि. 13 जुलै
: गुरुजींची सुटका; बैतूलहून नागपूरला आगमन.
1954
: दि. 9 ते 16 मार्च : सिंदीमध्ये प्रचारकांची बैठक.
1970
: दि. 1 जुलै : मुंबईत कॅन्सर - कर्करोग - ऑपरेशन.
1973
: दि. 22 ते 25 मार्च : नागपूरमध्ये अखिल भारतीय कार्यकारी-मंडल व प्रतिनिधी-सभा यांची बैठक, तीत समारोपाचे भाषण.
दि. 2 एप्रिल
: निरवानिरवीची तीन पत्रे.
दि. 5 जून
: रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी महानिर्वाण (मंगळवार ज्येष्ठ शु. 5 शके 1895).
------------------------------------------------
साभार - 'स्मृती पारिजात', भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन.